• Blog Stats

  • 2,827 hits
 • आर्चिव्ह्ज

 • एप्रिल 2010
  सो मं बु गु शु
  « मार्च    
   1234
  567891011
  12131415161718
  19202122232425
  2627282930  
 • Visitors

 • Protect

  MyFreeCopyright.com Registered & Protected
 • Advertisements

Nobody’s Like You, Mom…

नुकतीच मी एक पोस्ट लिहिली होती वडिलांसाठी , it was from a father to a father,  त्याचवेळी ठरवले होते थोडे आई विषयी लिहूया म्हणून….पण नवीन काय लिहिणार….तेव्हा हा एक प्रयत्न.


You cared for me as a little tot,
When all I did was cry a lot,
And as I grew your work did too–
I ran and fell and got black and blue.

I grew some more and it didn’t stop;
Now you had to become a cop,
To worry about mistakes I’d make;
You kept me in line for my own sake.
– Karl Fuchs

 

मायं…मंम…ममा…मामा…मॉमी…मां..अम्मा…आई …कितीतरी पद्धतीने आईला हाक जाते. देश बदलला, धर्म बदलला, पिढी बदलली कि हाक ही बदलते पण response तोच आणि तसाच…त्यात काहीही बदल नाही.

असे म्हणतात मुल जन्माला आल्यानंतर पहिला शब्द ‘म’ किवा ‘मा’ असा उच्चारतात. जेव्हा आपल्याला काही कळत नसते ..न आपले अस्तित्व असते..तेव्हा आपल्याला फक्त आईच ओळखते..आपली हाक तिलाच ऐकू जाते..आपली भाषा तिलाच समजते…बोलता येत नसते तेव्हाही  आणि बोलता आल्यानंतर चुकी केल्यावर (काही वेळा शरमेने) बोलू शकत नाही तेव्हाही…आपल्या नकळत ती आपली काळजी वाहते. आईच एक नाते असेल जे calculations च्या पलीकडे जाते..ती जे काही करते त्यात तिला परतीची अपेक्षाहि नसते…मुलांच्या आनंदात ती आनंदी होते.. हसते.. घराला घरपण आईच आणते…. आपली अर्थहीन बडबड कौतुकाने ऐकून घेते…ती आपल्याला important  बनवते.

बालपणी जसे संस्कार होतात तसे आपले व्यक्तिमत्व घडते…त्यामुळे मुलांच्या विकासात आईचा वाटा बाबापेक्षा मोठाच.  बाबा भौतिक  गरजांकडे बघतो आणि आई भावनिक….बाबाची जागा आई घेऊ शकते पण आईची जागा रीतीच रहाते…ती कोणीही घेऊ शकत नाही.

आई…ती कितीतरी कामे एकाच वेळी करू शकते…हजार गोष्टी लक्षात ठेऊ शकते…स्वतः निराश असतानाही मुलांचे  moral वाढवू शकते…हो आई नावाची परीच हे magic करू शकते…

 

भाकर मळताना माय..त्यात माया हि पेरते…
म्हणूनच मग पोटासंगे मनही भरते……

 

आमची आई…स्वतःसाठी कधी जगलीच नाही…सतत चिंता घराची, मुलांची आणि नवरयाचीही.  आई मोठ्या घरची…भरपूर शेती-पोती… घरात सर्वात लहान म्हणून लाडाने वाढलेली…. त्यामानाने आमच्या वडलांकडची  परिस्थिती तशी बेताचीच..पण तरीही ती स्वाभिमानाने राहिली…दादांना आवडत नाही म्हणून माहेरचे काही आणणे नाही आणि कधी माहेरी जाणे नाही. आईचा स्वभाव तापट आहे तसा…पण रीतीला धरून नात्यागोत्यात वागली…आमच्या दादांनी निवांत राहायचे आणि आपले काम पाहायचे ….चिंतेचे खाते आई कडे…. अजूनही तरुण मुलीला लाजवेल एवढ्या त्वरेने कामे उरकते…

मी जेव्हा कधीही नर्वस होतो…उगाच left out फिलिंग येते…तेव्हा आईचे शब्द आठवतात…वाईट वाटून घेण्यापेक्षा अशा माणसाकडे बघ ज्याच्याकडे तेही नाही जे तुझ्याकडे आहे…मग तुझे दुखः कमी होईल…मन जरा हलके होईल …मग लाग पुन्हा कामाला.. जोमाने..

प्रत्येक स्त्री आई होण्याआधी एक साधी स्त्री असते….मुल जन्माला आल्यावर तिच्यातल्या आईचा जन्म होतो…पण तिचे हे रूप काही औरच…पूर्वी पेक्षा जास्त सक्षम…समजदार..जागरूक आणि प्रेमळ….

आई  होऊन मुलांची आणि घरची जबाबदारी आपल्यासारख्या समाजात …(मिडल क्लास+ म्हणा हवे तर)….सोपे असेलही कदाचित..किमान आपल्याला  बेसिक गरजांची चिंता नसते…पण नाण्याच्या दुसऱ्याबाजूला गरिबी राहते..ती फार वाईट…काही सुचू  देत नाही…आपल्याला छोट्या वाटणाऱ्या गोष्टी किती कठीण असू शकतात..हे गरिबी पाहीली कि कळते…उद्याच्या जेवणाचा जिथे सवाल…अशा गरीबीतही…आई मुलांच्या हक्काशी compromise करीत नाही…ती  सर्वप्रयत्न करते आपल्याला मुलांना चांगले जीवन देण्याचा….चांगले विचार देण्याचा….त्यात नवरा चांगला असेल तर ठीक नाहीतर त्यालाही तिच सांभाळते…आल्या परीस्थितीला तोंड देऊन ती संसार करते, केवळ मुलांसाठी….तिचे स्वप्न मुलांच्या स्वप्नात ती पाहते…तुम्हा-आम्हा सारखे तिलाहि स्वतःचे आयुष्य असतेच कि…पण निस्वार्थ ती… मुलांसाठी जगते…कोणास ठाऊक हि मुले पुढे तिला सांभाळतील कि नाहीत ? …..कदाचित तिच्या गावीही असले विचार येत नसतील…

 

आई प्रत्येकासाठी  special असते….धन्य आहोत आपण कि आपल्याला आई मिळाली….देवाचे दुसरे रूपच ते  …काही दुर्देवी असतात ज्यांनी कधी आई पाहीली नाही …मायेचा हात आणि हळुवार थाप कधी अनुभवली नाही …केवळ आई हा शब्द माहित आहे पण त्याचा अर्थच कळला नाही…त्यांचे काय ? ….माझ्याकडे नाही ह्याचे उत्तर ….पण जिच्यामुळे हे जग दिसले तिचे उपकार थोर ..तिचे पांग फिटू शकत नाहीत आणि ती माउली तशी अपेक्षाही नाही करत…म्हणून म्हणतो…its not late than never …जा आणि बोला… लव यु ममा !!!

 

 

 

http://www.youtube.com/watch?v=X-05pGLXQwQ&feature=related

Advertisements