Daddy’s shoes…

तुम्ही नीट निरीक्षण केले असेल तर बघा लहान मुले त्यांच्या बाबांचे जोडे घालून घरभर मिरवतात …..सर्वच घरात  हा scene common असेल………माझा मुलगाही तेच करतो आणि कदाचित मीही करत असेल माझ्या लहानपणी….अगदीच लहानपणाचे आठवत नाही पण जसे समजायला लागले तसे मला दादांच्या (माझे वडील आम्ही त्यांना दादा म्हणतो ) चपलेचे (१ नाकाची चप्पल) भयंकर आकर्षण….it was always a comfort in it

आमचे दादा साधे सिम्पल …पांढरा सदरा आणि त्यावर किंचित काळी/करडी तत्सम संगाची विजार.. असा त्याचं पेहराव…जेव्हा पासून मला आठवते तेव्हा पासून पांढरा सदरा हा fix…अजूनही तसेच…साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा नियम..(…उच्च विचारसरणी ठीक आहे पण साधी राहणी 😦 तेही कॉलेजात गेल्यावर ……)

मोठी family ..सुरुवातीला सर्व मुली, मग मी आणि लहान दोघे…एवढ्या सर्वांकडे लक्ष देणे…शेती…नोकरी.. आजी आजोबा ….लहान काका ….अशा त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आम्हाला लहानाचे मोठे केले…आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच…नोकरीत कसले भागते.. त्यामुळे शेती आणि प्लॉट चा व्यवसाय…ह्यासर्वात त्यांना आमच्यासाठी फारसा वेळ नसायचा…काही हवे असेल तर आईला सांगायचे आणि मग मूड बघून ती दादांना सांगणार….फालतू लाड चालत नसत….दिवाळीचा ड्रेस आणि शाळेचा गणवेश  हेच काय तर दोन ड्रेस वर्षातून एकदा मिळत.

दादांचा सुरुवातीपासूनच धाक ….प्रगती पुस्तकावर सही आणि शाळेची फी…एवढ्याच विषयावर काय ते बोलत असू ….दिवस भरात एकदा तरी नक्की विचारणार….काय रे अभ्यास कसा चाललाय ?…बघू तुझी वही ????….मित्रही घाबरायचे 🙂

दादा स्वतः पुण्यात शिकले …त्यांच्या काळात… म्हणजे जवळपास ५० वर्षापूर्वी…छोट्याशा खेड्यातून…किमान ३०० किलोमीटर दूर असलेल्या पुण्यात ते आले…परिस्थितीमुळे शिक्षण सोडले आणि नोकरीला लागले…बाहेर पडल्यामुळे विचार बदलले…मला नेहमी सांगत ….भाऊ आपली संपत्ती म्हणजे आपले शिक्षण…आपल्याकडे दुसरे काही नाही जे तुला पुढे घेऊन जाईल…

लहानाचा मोठा झालो …कॉलेजला गेलो…तेव्हा मात्र आमचे वाद व्हायला लागले….कारण त्यांचे सर्वच नियमात….आणि आपला सगळाच गोंधळ (हे त्यांचे मत…).. मग काही जमेना…शाब्दिक चकमकी तर वरचे वर होत…मग आईच काय तो मार्ग काढत असे. होस्टेल मध्ये राहायचो..महिन्याचा खर्च मागितल्या पेक्षा नेहमी कमीच मिळायचा…ते त्यांच्या काळातले calculation करायचे…आणि ते काही आमच्या काळात match होत नसायचे…….मग पुन्हा चिडचिड….त्यांचीही आणि आमचीही……मी एक  पेन ५ वर्षे वापरला आणि तुम्हाला तुमच्या साध्या वस्तू सुद्धा सांभाळता येत नाहीत ???….मग… पैसे कमवायची अक्कल नाही…… वगैरे……. ऐकावे लागायचे….खरे सांगायचे तर फार राग यायचा….मनात यायचे ह्यांना प्रत्येक गोष्टीत आपल्या चुकाच दिसतात ……..असे अनेक किस्से…..एकदा तर महिनाभर बोललो नाही आम्ही………..मला तर दादाच चुकीचे वाटायला लागले ..

आज इतक्या वर्षानंतर हे सारे काही आठवते आहे जसे च्या तसे …..आता मीही बाबा झालोय….bread & butter च्या मागे धावतोय….. जबाबदारीत कुठे कमी नको पडायला ह्याची काळजी घेतोय…… कामाच्या व्यापात मुलांना फारसा वेळ देत नाही खरा …. पण करणार काय…..काळ बदललाय …स्पर्धा……माझं  करियर….वाढती महागाई……सर्व गणितच बदललेय…….

तशी परिस्थिती  चांगली आहे ……मुलाने काहीही  मागितले तरी लगेच घेऊन देऊ शकतो……पण देत नाही…कारण त्याच्या सर्वच demand योग्य वाटत नाही…games ..CD ‘s …PSP ….कशाला हव्यात नसत्या भानगडी ?…..मागितले आणि मिळाले कि त्याची किंमत राहत नाही……मनात येते ….मी एक bag ३ वर्षे वापरली आणि ह्याला प्रत्येक वर्षी नवीन bag ….रागावलो कि मीही बडबडतो…. अभ्यासाचे काय ???……शाळेला दांडी मारायची नाही….TV थोडा कमी बघा आणि अभ्यासात लक्ष  घाला …..फालतू लाड नाही चालणार….बायको बोलते…लहान आहे रे तो…..समजेल त्याला सर्व काही थोडा मोठा होऊदे ….मलाही कळते सारे….असेही रागवताना मला का आनंद होतो ?  …पण प्रसंगी कठोर व्हावेच लागते ……जग बदलतंय…. मोठा झाल्यावर ह्या जगाला तोंड देण्याची हिम्मत हवी…आणि ती आपणच दिली पाहिजे……मी आहेच त्याच्या पाठीशी….पण माझ्याशिवाय चालला तरच  माझ्यातला बाबा जिंकेल …..माझे रागावणे दिसते पण त्या मागची काळजी, प्रेम हे नाही दिसत कोणाला…….आणि हा सारा आटापिटा त्यांच्यासाठीच ना ….

आता कळतंय… मला रागवताना दादानाही कुठे आनंद होत असेल…त्यानाही हेच वाटत असेल जे आज मला वाटते आहे…..मीही दादांसारखा वागायला लागलो आहे …..माझ्या बोलण्यात, चालण्यात त्यांना अनुभवतोय……प्रत्तेक दिवस मी त्यांना माझ्यात जगतोय….now I am in my Daddy ‘s shoes, can feel the same  comfort.

Yeah…..everyday i see….a little more of father in me !!!!!!!!

कदाचित त्त्यामुळेच सर्व मुलांना बाबाच्या बुटाचे आकर्षण असेल  ….कारण कधीतरी…तोही त्या बुटात  उभा राहून जगाकडे बघणार असतो आणि बाबाचे आयुष्य, स्वप्न जगणार असतो….माझां मुलगाही मला समजून घेईल…when he will be in my shoes !!!!!!!!!!!!!!!!

आता दादा मित्रासारखे वाटतात….नव्हे मित्रच झालेत ते…..Happy Birthday Dad !!!!!!!!!!

Advertisements

32 प्रतिसाद

 1. awesome lihilayes
  sundar
  kharach chhan

  • Thanks चरण …जसे सुचले तसे लिहिले..आज वाढदिवस आहे त्यांचा..ते पुण्यात आलेत पण मी नाही जवळ…म्हणून म्हंटले आजच post करू…A Birthday Gift…मला call केला त्यांनी वाचून…खुश होते आणि थोडे हळवे…माझी आठवण आली असेल !!!

 2. It was really a nice thoughts.It is same for me too.But I think don’t be too strict on the kids.let them have fun.let them have what we have not able to experience..let enjoy our childhood with them..There are other means to make them strong and face the world…
  let me know ur thoughts on this…

  • Thanks योगेश, अरे आपण कुठे strict आहोत..पण व्हावे लागते…कळेल… थांब थोडे दिवस 🙂 ….हे मी आपल्या बालपणाबद्दल सांगितले …तेव्हाचे वातावरण तसेच होते…communication gap ..जो आता कमी झालाय….आणि it is all about fathers feelings and his behavior….परिस्थितीप्रमाणे वागणे बदलते.. पण चीड चीड होतेच रे…..आणि का होते माहित आहे ….कारण आपण जास्त काळजी करतो ..घाबरतो… हा चुकणार तर नाही ना वगैरे….रागावण्याचे कारण तेव्हाही आणि आताही सारखेच आहे….फक्त express वेगाल्या पद्धतीने होते एवढेच…बाकी I agree with you..जे आपल्याला मिळाले नाही ते त्यांना दिले पाहिजे …त्यांच्या मनाप्रमाणे जगू दिले पाहिजे …पण चुकत असेल तर ? तूच सांग …keep the ball rolling…

 3. क्या बात है!!!!
  मस्त …… प्रत्येक शब्द मनापासून आलाय!!!!!
  आणि हो….. दादांनी कॉलेजमधे असताना दिलेले वडिलकीचे सल्ले तेव्हढे राहिले ना रे…… 🙂
  असो…

  दादांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…….

 4. आमच्या कडे पण लेकाचे बाबांचे घड्याळ, पेन व शूज पळवणे चालूच असते. खूप दिवसांनी मी ब्लॉग वर आले व एक छान पोस्ट वाचण्यास मिळाली धन्यवाद.

 5. शेखर सर्व जण नेहमी आई वरती लिहितात, धन्यवाद तू वडिलांवर लिहीलं. आपल्यला काही तरी लागलं तर पहिला शब्ध येतो तो आई ग! आपण साधी विचारपूस करताना तुजे आईबाबा कसे आहेत?….असेच विचारतो, म्हणजे नेहमी आईचं..आईचं!!! ….मग बाबा कुठे ? ??
  आपल्यामध्ये एक म्हण आहे ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” इथे एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या आयुष्यात वडिलांना काहीच महत्व नाही!!! पण बिचाऱ्या बापाने काय केले? आठवते जेवण करणारी आई पण शिदोरीची सोए हि बापच पाही, मुलाच्चा नोकरीसाठी उंबरठे झिजवणारा बापच! मुलीच्चा स्तलासाठी उंबरठे झिजवणारा बापच!! काटकसर करून मुलास देतो पोकेट मनी … आपण मात्र वापरी जुनी शर्ट- pant . तरुण मुलाच्चा शवाला पण कान्धा देतो तो बापच असतो …. आई ने फक्त अश्रू वाहचे…

  जीवनभर मुलांचा मागे राही साधीच्छ bapacha … केह्वातरी आठवा त्याचे श्रम/माया/बलिदान/त्याग.

  • जियो मेरे लाल !!!.. …. खरे आहे तुझे बाबा बद्दल फार लिहिले जात नाही आपल्याकडे….पण फिरंग लिहितात कि …cultural difference …..पण हल्लीचे बाबा जास्त close असतात मुलांच्या ..तेव्हा बाबा बद्दलाही लिहिले जाणारच ….

 6. Hey Bhau,

  Great….. Everything makes us to think go in our childhood and remember our old days…..
  Girish la vichar ..– chetan pativar lihi “Daptar milalyashivay jevan nahi 😉
  Nemich hattipana aani mag lahan aslyacha fayada, pan tarihi faltu hatta purvle nahit..Aata khup lawkar motha zalo asahi vatay, aani mag tyach dadana khup kahi dyaychay karun dhakvachay…. Baghya kiti yeshasvi hote te..!! tyanche vichar, shikvan aani aashirvad nakkich khup pudhe netil, aapna sarvana evda nakki…

  Kalji ghe,
  Chetan

 7. चेतु…मस्त आठवण दिलीस …मला आताही पाटी आठवून हसू येतंय 🙂 …आणि गिरीशचे किस्से काही कमी नाही …शाळेला दांड्या वगैरे …दाजीलोक ..ते सर्व लिहीन नक्की…आजची पोस्ट Birthday Gift from a father to a father …..आणि श्रेय तुझ्या वाहिनीला…हि तिचीच idea …मला ऑफिस शिवाय काही सुचते का ?

 8. it was really a nice thought… kharech khup chhan lihiles tu…he wachtana ekikade ashruhi tap tapat hote aani ekikade wachane suru hote… pan aik sangu,aai pesha babach jasth close astho. khuthlyahi adchanicha prashnat [mul lahan aso va mothe ] thyala babach hawa asto. aani toch tyachya prashnanche uttare khubine deue shakto.

 9. कळतंय मला… तू आहेस ना त्यामुळे टेन्शन नाही 🙂

 10. Shekhar Bhai,
  Chha Gaye.

  Chhan Lihiles.
  Bapavarachi ek kavita aahe
  Ti takayala havi hotis.
  Mala sapadali tar pathavato tula.
  Add kar ti dekhil yaat.

  Belated Happy Birthday to your dad!

 11. Thanks Hem…पाठव नक्की ……म्हणजे आपणहि कविता वाचता 🙂

 12. Awesome brother……
  You got one more option of career. 😉

  I like chetu’s comment that we perticularly me :-
  “Daptar milayala shiway jewnar nahi ” …
  I dont know from where i got the idea.. in that time….
  Our parent are really great 🙂
  Thats why we achieve so much in life …all credit goes to them….

  • Yes, all credit goes to them…….आपण जे काही आहोत त्यांच्या मुळेच..म्हणूनच लिहिले गेले…आणि हे Blogging फक्त छंद आहे रे …..आपण कधीतरी लिहिणार म्हणून कधीतरी नावाने घेतला 🙂
   माझां ब्लोग वाचून कोणाला आवडला …थोडा आनंद मिळाला ….कि बर वाटेल …thats it .

 13. khup chhan mama…..asech lihat raha…..khar tar kay comment karu suchat naai aahe…….. khup heart tuching lihtos tu, te pan sopya bhashet…………
  keep it up ..!!!!!!!!

 14. Mitra kya baath hai…..kya baath hai….kya baath hai.

  “Any man can be a father, but it takes a special person to be a dad”

  It’s only when you grow up, and step back from him, or leave him for your own career and your own home – it’s only then that you can measure his greatness and fully appreciate it. Pride reinforces love.

  Our father planted for us, and we should plant for our children………
  Great yaar.

  • Thanks Vinod….you are very true…it takes a special person to be a Dad…. Family values make us grow, take good decisions and help us survive in all situations. I bet, everyone understands father after becoming a father. And specialty of these fathers is, they change themselves with time….they become friend when time comes.one just needs to recognize it.

 15. Chhan…Vishay chhan ahe and to hi vadilanvar, far kami lok lihtat. Start intersting ahe ……pan vachatana kahi navin vatal nahi…..ajun chagal apekshit ahe……

  • राजेश…असेच वाचत रहा :)…अरे तो मोठा विषय आहे लिहिण्यासाठी आणि Data पण आहे sufficient ….पण मला थोडक्यात आणि त्यांच्या जागेवर गेल्यावर कसे वाटते ते सांगायचे होते..बाकी आपण common man त्यामुळे वेगळे काय घडणार….पण पुढे लिहीन….part २ यायचाय ;)….

 16. शेखर, अतिशय उत्तम लेख. मी पण हल्लीहल्लीच बाबा झाल्याने अजूनच भावाला. खूप छान.

 17. Hey.. Shekhar, Good work.. Khup chaan lihila aahes.. khup Matured ani touching lekh..

 18. hmmm….shant jhaloy..athavtoy kahi tari…juna….paristhithi jalpass sarkhi hoti…tyech suchana..updesh…pan aaj je kay aahe te tyanchamule..all credit goes to him…f9 u were with u r dada all the time..i missed that too….he was never with us….weekly 2 days thats all..he was and he is good friend from that ..never scolded ..never bitten up…all contrct to aai…..whatever i learned that is from Antu…gr8 guy…i hv not seen such excellent pesron in my life…khup kahi chaan goshti shikwayacha tevha vedya vatayachya ..aata kalata…nehmi mhnayacha..mitra ghari aale tyanchya shi baher rastyvar bolu na naye..tyanna nehmi aat bolwave…offer them water..so the can offer ..u water when u visit them n one day u too will tea….
  when u go to other place i f u r seating on sofa ..bed or diwan…sit properly..when u get up pull the bedshit..or cover which u distrubed unknowigly..or keep the chair at proer position….so many tihngs..really…he is very proude abot me..whenever i visit him..he intorduce with his frends other people with gr8 passion…

  thasmbtho..baracha kahi aahe…i think not the correct time…

  ye….

  • हो यार खरे आहे तुझे…आंटू मोठ्या भावासारखा वाटायचा नेहमी..त्याची भीती पण वाटायची जाम 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: